निवडणुकीसाठी साडेचार हजार निवडणूक कर्मचारी तैनात

निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱ्याऱ्यांच्या नियुक्त्या
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 25, 2024 14:00 PM
views 253  views

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नेमूणुका जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केल्या आहेत, त्याचबरोबर ४ हजार ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, भरारी व स्थिर पथकेही तैनात करण्यात आली आहेत

सिधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या तीनही मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नेमणुका केल्या आहेत, त्यात कणकवलीसाठी कणकवलीचे उपविभागीय अधिकारी जगदीश काकतकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी व कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. कुडाळसाठी कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काकूशे यांची निवडणूक निर्णय अधिकारी व कुडाळ तहसीलदार बिरसिंग वसावे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सावंतवाडीसाठी सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची निवडणूक निर्णय अधिकारी व सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान असले तरी पूर्व तयारी करण्यासाठी य निवडणूक प्रशिक्षण देऊन कर्मचाऱ्यांना तयारीत ठेवण्यासाठी ४ हजार ५०० निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्रे असून मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन कर्मचारी तसेच २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीसाठी लागणारे कर्मचारी आणि कार्यालयीन कामासाठी लागणारे कर्मचारी मिळून ४,५०० निवडणूक कर्मचारी म्हणून घेण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणारी बेकायदेशीर दारू वाहतूक, पेसे, अमली पदार्थ यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे तसेच संशयित व्यक्तीयर लक्ष ठेवण्यासाठी व्हीडीओ सर्वलन्स टीम, स्थिर व भरारी पथके नेमली असून जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाथ्यावर ही पथके तैनात केली आहेत, यातील भरीरी पथके ही राजकीय कार्यक्रमावर लक्ष देवून राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देवण्यात आली आहे, तर २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता सकाळी ६ वाजे पर्यंत मुदत देण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक विभागाकडून उपलब्ध झाली आहे.