शिरोडा माजी सरपंच विशाखा परब यांचे निधन...!

Edited by: दिपेश परब
Published on: October 08, 2023 11:09 AM
views 102  views

वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा गावच्या माजी सरपंच व शिरोडा परबवाडी येथील रहिवासी सौ. विशाखा विकास परब (४८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान विशाखा परब यांना हृदयविकाराचा धक्का आला याबाबत सावंतवाडी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

विशाखा परब यांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असताना त्यांना हा हृदयविकाराचा धक्का आला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, भावजय असा परिवार आहे. विशाखा परब यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शिरोडा गावसाहित तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. भाजपचे कार्यकर्ते विकास परब यांच्या त्या पत्नी होत. विशाखा परब यांनी सन २०१२ ते २०१७ या कालावधीत यशस्वीपणे सरपंच पदावर काम केले होते. तर सन २०१७ ते २०२२ या कालावधीत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले होते.