तळकटचे माजी सरपंच शिवाजी सावंत भोसले यांच निधन

Edited by:
Published on: December 10, 2023 11:13 AM
views 394  views

दोडामार्ग : तळकट गावचे माजी सरपंच शिवाजी दत्ताराम सावंत भोसले यांचे रविवारी ( १० डिसेंबर २३) रोजी निधन झालं.  त्यांचेवर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते. मात्र, वयोवृध्द झाल्याने त्यांचे प्रकृतीने साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. तळकट गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. त्यांच्या निधनाने तळकट गावातून शोक व्यक्त केला जात आहे. तळकट गावचे विद्यमान सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांचे ते चुलत काका होत.