मोचेमाडच्या माजी सरपंच स्वप्नेशा पालव यांचं निधन

Edited by: दिपेश परब
Published on: June 01, 2025 20:13 PM
views 141  views

वेंगुर्ले :  मोचेमाड गावच्या माजी सरपंच स्वप्नेशा संतोष पालव  वय ५० यांचे शनिवार ३१ मे रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पालववाडी मोचेमाड येथील रहिवासी स्वप्नेशा पालव यांनी मोचेमाड ग्रामपंचायत सरपंच म्हणून सन २०१९ ते मार्च २०२४ या कालावधीत काम पाहिले. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या पच्छात पती, एक मुलगी, एक मुलगा, सासू असा परिवार आहे.