रेडीच्या श्री माऊली अखंड हरिनाम सप्ताहाला माजी खासदार निलेश राणे यांनी दिली भेट

देवस्थान तर्फे करण्यात आला सत्कार
Edited by: दिपेश परब
Published on: August 31, 2023 16:19 PM
views 394  views

वेंगुर्ले : कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेडी येथील श्री देवी माऊलीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या भेटी दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सप्ताहातील दिंडी रथ पथकाना प्रमाणपत्रक, सन्मानचिन्ह आणि मानधन वितरित करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर तसेच वसंत तांडेल, भूषण सारंग, देवस्थान मानकरी, ग्रा. प.सदस्य, अमित गावडे, राहुल गावडे. जगनाथ राणे, महेश कोणाडकर, देवेंद्र मांजरेकर, प्रसाद रेडकर, ओंकार कोणाडकर, बुज्जी, रश्मी गावंडी, नितीन सावंत, नंदकुमार रेडकर, अण्णा गाडेकर, मंगेश कामात, मनोज उगवेकर, भाई कांबळी, नार्वेकर, अंकुश राणे आदी यावेळी उपस्थित होते. 

प्रादेशिक पर्यटन मधून रेडी माऊली देवस्थान साठी अन्नक्षेत्र, हॉल आणि भक्तनिवास मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल रेडी श्री देवी माऊली देवस्थान तर्फे निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तर यावेळी राणे यांच्या हस्ते देवीचा उत्सव यूट्यूब वर प्रसारण करणारे भाई पंडजी यांचा सत्कार करण्यात आला.