
मुंबई : माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन हातात बांधून त्यांचं पक्षात स्वागत केले. कोकणात ठाकरे सेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहेत.एकेकाळचे नारायण राणे यांचे उजवे डावे असलेले राजन तेली व परशुराम उपरकर स्वर्गही परतले आहेत.ठाकरेंनी या दोघांना प्रवेश देऊन राणेंना एकप्रकारे शह देण्याचा प्रयत्न केला.या प्रवेशांमुळे सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला आणखी बळ मिळणार आहे.उपरकर यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील मालवण व कणकवली या दोन मतदारसंघात सेनेला फायदा होणार आहे.
या मतदारसंघातील किनारपट्टी भागात उपरकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्याचा उपयोग सेनेच्या उमेदवारांना होणार आहे. उपरकर यांच्या सोबत बाबल गावडे,आशिष सुभेदार, विनोद सांडव ,दीपक गावडे,मंदार नाईक,राजेश टंगसाळी ,संदीप लाड, आप्पा मांजरेकर, सचिन मयेकर, नाना सावंत,आबा चिपकर, विजय उपरकर,प्रणव उपरकर आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रवेश केला आहे.यावेळी ठाकरे शिवसेनेचे सचिव,माजी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक , आ.मिलिंद नार्वेकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,संदेश पारकर, अतुल रावराणे, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, गितेश राऊत,वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.