
खेड : खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व प्रसिद्ध किराणा व फटाक्याचे व्यापारी विजय उर्फ बाबू रघुनाथ चिखले (वय 66) यांचे हृदयविकाराने मुंबई येथे निधन झाले. गेले आठ दिवस मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 1991 पासून सलग 15 वर्षे ते शिवसेनेचे नगरसेवक होते. 1998- 99 मध्ये त्यांनी नगराध्यक्ष पद भूषविले. नगरपालिकेत बांधकाम समितीचे सभापती व अनेक समित्या वर त्यांनी काम केले होते. खेड शहर रिक्षा सेनेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात,आई, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, सुन असा मोठा परिवार आहे.