
दोडामार्ग : केर गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी उपसरपंच शिवराम (भाई) नाना देसाई (वय ७४) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभाप्रमुख प्रेमानंद देसाई यांचे ते काका होत. त्यांच्या पश्यात तीन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.