मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी माजी नगरसेवकांकडून बालगृहाला मदत

Edited by: मनोज पवार
Published on: September 20, 2024 13:11 PM
views 195  views

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील भाजपच्या नगरसेवक, नगरसेविकांनी रत्नागिरीतील बालगृह व निरीक्षणगृहाला जिन्नस, वाणसामानाची मदत दिली. शुक्रवारी दुपारी बालगृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी बालगृह व निरीक्षणगृह संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर सावंत, प्रकाश शिंदे यांनी मदत स्वीकारली. या कार्यक्रमाला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सदस्य सचिन वहाळकर, भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, सरचिटणीस मंदार मयेकर, राजन पटवर्धन, मंदार खंडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमरकर, माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, उमेश कुळकर्णी, समीर तिवरेकर, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, संपदा तळेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप उर्फ बाबा नाचणकर, राकेश भाटकर, शेखर लेले, ओ.बी.सी जिल्हाध्यक्ष भाई जठार, ऋषिकेश कामतेकर आदी उपस्थित होते.

बालगृहातील मुलांसाठी साधारण महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, डाळी, साखर, तेल, कडधान्य, पिठ यांचे वितरण माजी नगरसेवकांनी केले. या वेळी उमेश कुळकर्णी म्हणाले की, मंत्री चव्हाण हे नेहमी कार्यकर्ते म्हणूनच काम करतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फूल ना फुलाची पाकळी देण्याचे काम नगरसेवकांनी केले आहे. माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी श्री. रविंद्र चव्हाण हे रत्नागिरीचे भाजपचे पालक म्हणून ८ वर्षे काम करत आहेत. त्यांनी बांधकाम खात्याच्या माध्यमातून कोकणात रेल्वेस्थानकांकडे जाणारे रस्ते व स्थानकांचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले.ते आज पूर्णत्वाकडे जात आहे

याप्रसंगी मंत्री रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा देण्याकरिता फोनही करण्यात आला. त्यावेळी सुधाकर सावंत व सर्व माजी नगरसेवकांनी मंत्री चव्हाण यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सुधाकर सावंत यांनी सांगितले की, आमच्या इथल्या दोन विद्यार्थ्यांचे अनुकंपा भरतीमध्ये काम होत नव्हते. मग आम्ही मंत्री चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व माहिती ऐकून घेऊन आठ दिवसांत पत्र मिळेल असे सांगितले. पुढे जाऊन त्यांनी असे सांगितले की जर भरतीसाठी कोणाला पैसे दिले असतील तर त्वरित परत घ्यावेत, असा त्यांचा सुखद अनुभव आला. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो व मोठीमोठी पदे त्यांनी मिळोत, अशी गणपती चरणी प्रार्थना करतो.