
वेंगुर्ला : वेंगुर्ला बंदर येथे २३ मे रोजी रात्री छोटी होडी बुडून झालेल्या दुर्घटनेत माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी दुर्घटना घडल्यापासून सुरू असलेल्या मदतकार्यात आपल्या मित्रमंडळी सहित सहभाग घेतला होता. २३ रोजी संपूर्ण रात्रभर शासकीय यंत्रणेशी समन्वय साधने, रुग्णवाहिका तैनात ठेवणे, पोलीस ठाण्याशी संपर्क करून आवश्यक ती कागदपत्रे जमा करणे, इतर शोधकार्यत सहभाग घेऊन ठिकठिकाणी शोधकार्यासाठी संपर्क करणे, विविध शासकीय यंत्रणांशी संपर्क करणे आदीमध्ये नागेश गावडे यांचा सहभाग होता. नागेश गावडे हे अशा मदतकार्यात नेहमीच सहभागी असतात. या त्यांच्या मदतकार्याचे संपूर्ण शोधमोहिमेत मोलाचे सहकार्य मिळाल्याची भावना पोलीस, शासकीय, कोस्टेल यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे.