माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांची कार्यतत्परता

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 19, 2025 14:46 PM
views 279  views

मालवण : शहरातील डॉ. ठाकूर दवाखाना नजिकच्या परिसरात एक गाय मृत झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती नगरपरिषदेला दिली. खड्डा खोदून पुढील कार्यवाहीसाठी जेसीबी मशीन आवश्यक होती.

मात्र नगरपरिषद जवळ खरेदी करण्यात आलेल्या जेसिबी वर ड्रायव्हर नसल्याने तो उपलब्ध होऊ शकला नाही. दरम्यान माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांना याबाबतची माहिती नागरिकांनी दिली. म्हाडगुत यांनी तात्काळ स्वखर्चाने जेसीबी बोलवत योग्य पद्धतीने पुढील कार्यवाही केली. म्हाडगुत यांनी तात्काळ दखल घेतल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले.