माणगाव ग्रामस्थांचं सलग तिसऱ्यांदा घंटानाद आंदोलन

सरपंचांवर गंभीर आरोप
Edited by: भरत केसरकर
Published on: May 18, 2023 19:06 PM
views 93  views

कुडाळ : माणगाव धरणवाडी ग्रामस्थांनी आज सलग तिसरांदा घंटानाद आंदोलन केले. सरपंच आपल्या नातेवाईकांना पाठीशी घालत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे.तब्बल चाळीस वर्षे रस्त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी आल्याचा आरोप होत आहे. 

 गेले 40 वर्षाचा धरणवाडी रस्त्याच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या प्रश्ना संदर्भात आज पुन्हा तिसऱ्यांदा धरणवाडी ग्रामस्थांच्या वतीने माणगाव ग्रामपंचायतच्याविरोधात छेडलेल्या घंटानाद आंदोलनाला आज ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीडीओचे आदेश न मानणारा माणगाव सरपंच मनीषा भोसले यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

माणगाव धरण वाडी येथे मुख्य रस्ता गावातील काही ग्रामस्थांनी अडवून धरला आहे. यासंदर्भात याच वाढीतील धुरी आणि वारंग कुटुंबीय असे सुमारे शेकडो नागरिक वारंवार तब्बल 40 वर्ष ग्रामपंचायतीकडे रस्त्याची मागणी करत आहेत. परंतु ग्रामपंचायत प्रशासन हा रस्ता देण्यास तयार होत नव्हत.यानंतर याच वाडीतील लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला आणि या दाव्याचा निकाल या लोकांच्या बाजूने लागला. ग्रामपंचायत ने तात्काळ रस्ता करावा असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र विद्यमान सरपंचाने या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत कोर्टाचे  आदेश मानलेच नाहीत.असा आरोप लोकांनी केलाय त्यामुळे येथील वाडीतील लोकांना रस्त्यासाठी  तब्बल 40 ते 50 वर्ष होऊ नये आजही फिरावे लागत आहे,असा आरोप पांडुरंग धुरी ग्रामस्थ धरणवाडी यांनी केला आहे..

    येथील रस्ता अडवल्याने या वाडीत सुमारे अडीचशे तीनशे लोक अडचणीत आले आहेत. त्यांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध होत नाही.परिणामी आजारी पेशंटला नेताना फार मोठी तारेवरची कसंरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील महिलाही फार बेजार झाल्या आहेत.गावातील महिला.सौ.काव्या धुरी यांनी आरोप केले आहेत.

विद्यमान सरपंचाच्या  कालावधीत तीनदा आंदोलन उपोषण करण्याची त्याचबरोबर घंटानाद करण्याची पाळी येथील ग्रामस्थांवर आली.मात्र सरपंच यानी कोणतीच दखल घेतली नाही. जे रस्ता आडवतात ते सरपंचांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे सरपंच याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप घंटानाद आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांकडून होत आहे.हा गंभीर आरोप दिपक वारंग यांनी केला आहे.

    दरम्यान या घटनेबाबत माणगाव सरपंच सौ.मनीषा भोसले यांना विचारले असता असं कोणत्याही प्रकारचा रस्ता अडवला जात नाही ज्या टेक्निकल गोष्टी आहे त्याची आपण माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया त्याने बोलताना दिली.मात्र सरपंच यांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.मनिषा भोसले सरपंच माणगाव यांनी नाराजि व्यक्त केली आहे....