
वेंगुर्ला:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या मार्फत २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाढाव्याच्या शुभ मुहूर्तावर आय केअर ऑप्टिकलच्या नूतन शाखेचे उदघाटन होत आहे. यामुळे आता तळवडे गावसाहित पंचक्रोशीतील नेत्र रुग्णांना सुसज्ज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी करून मिळणार आहे. या आय केअर ऑप्टिकल सेंटरचा शुभारंभ उद्या बुधवार दिनांक २२ मार्च २०२३ रोजी सायं ४ वाजता तळवडे गेट, बाजारपेठ, मातोंड रोड याठिकाणी होणार असून याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण डॉ. गद्रे व दाभोलकर परिवार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.