
कणकवली: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कणकवली पोलिस निरीक्षक सचीन हुंदळेकर यांनी नागरिकांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीदरम्यान निवडणूक बूथ शेजारी अनाठाई कोणी फिरू नये तसेच मतदान करणाऱ्या नागरिकाला कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवू नये व आदर्श आचारसंहितेचे पालन करावे कडक कारवाई करणार असल्याचे सांगत मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी कणकवली पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी देखील पोलिसांनी कणकवली शहरासह फोंडाघाट,खारेपाटण ,तरळे ,नांदगाव ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती