सावंतवाडी - वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील उघड्या गटारावर बसवल्या फरश्या

सामाजिक बांधिलकीने वेधलं होतं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: July 14, 2023 18:47 PM
views 77  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील उघड्या गटारावर फरशी घालण्याबाबत सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सदरे यांना निवेदनाद्वारे विनंती केली होती.  सामाजिक बांधिलकीच्या विनंतीला मान देऊन व वारंवार  होत असलेल्या अपघातांचे  गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सावंतवाडी वेंगुर्ले बस स्टँड समोर  मुंबई गोवा हायवेच्या बाजूला उघड्या गटारांवर फरशा घालण्यात आल्या.

गेली कित्येक वर्ष ही गटारे उघडी असल्याकारणाने वारंवार ज्येष्ठ नागरिक , वृद्ध व्यक्ती, तसेच शाळकरी मुले पडून जखमी व्हायचे त्यातील काही व्यक्तींना सामाजिक बांधणीच्या माध्यमातून औषध उपचार देखील करण्यात आले होते. आता त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी समाधान व्यक्त केले आहे .याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सदरे यांचे आभार सामाजिक बांधिलकी कडून मान्य झाले आहे.