
दोडामार्ग : दोडामार्ग विजघर राज्यमार्गावर भेडशी येथील पुलानजीक पहाटे 4 वाजता दोन गाड्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज घडली. गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी घडली नाही. मात्र गाड्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि पुराचे पाणी कमी झाले. त्यानंतर दोन्ही गाड्या येथील ग्रामस्थांनी ढकलून व जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणचे पूल पाण्यात खाली गेले होते. भेडशी खालचा बाजार येथील पुलानजीक दोडामार्ग विजघर रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला होता. तिलारी मार्गे दोडामार्गच्या दिशेने येणारी बोलेरो पीकप गाडी व स्कॉडा कंपनीची नवीकोरी कार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेली. वाहत असलेल्या कारला दोडामार्ग पोलिस व ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात उतरून कारला दोरी बांधून झाडाला बांधून ठेवली. त्यानंतर पुराच्या पाण्यात वाढ झाली त्यावेळी बांधण्यात आलेली दोरी पाण्याच्या प्रवाहात तूटली. त्यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, अनिकेत कुरतडकर, भरत यांनी पुराच्या पाण्यात उतरून पुन्हा दोरीच्या सहाय्याने गाडी बांधून ठेवली. त्यानंतर पाऊस व पाणी कमी झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या.
100 हून अधिक बॉयलर कोंबड्या मेल्या
घाट माथ्यावरून गोवा येथे बॉयलर कोंबड्या घेऊन जाणारी बोलेरो पीकप गाडी पुराच्या पाण्यात अडकली. त्यावेळी गाडी बंद पडली. जसजशी पुराच्या पाण्यात वाढ होऊ लागली त्यावेळी दोन्ही गाड्या पाण्यातून वाहत जाऊन लगतच्या गटारात अडकल्या. त्यावेळी सुमारे 100 हुन अधिक बॉयलर कोंबड्या पाण्यात गुदमरून मरण पावल्या. यात हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.
आपतकालीन व्यवस्तेवर नाराजी : मायकल लोबो
तालुक्यात धोधो पाऊस पडत आहे. ठीक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे अनेक मार्ग बंद झालं आहेत . भेडशी येथे एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. सकाळपासून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूलच्या सेफ्टी किट सर्व यंत्र सामुग्री या ठिकाणी उलब्ध नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्यावेळी काय करायचे. या सर्व सुशेगात असलेल्या आपत्कालीन व्यवस्थेवर लोबो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महसूल बांधकाम विभागाकडे मनुष्यबळ नाही मग आम्ही एवढे सहकर्य करतो तर आम्हाला सामुग्री तरी आणून द्या असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
8 तासांनी गाड्या काढण्यात यश
पहाटे 4 ची घटना पाण्याच्या पाटतळीत झपाट्याने वाढ झाली पाण्याच्या प्रवाहात दोन्ही गाड्या वाहून लागल्या शरथीचे प्रयत्न करून दोरीच्या सहाय्याने गाडी बांधून ठेऊन 12.30 ते 1.00 च्या सुमारास पाणी कमी झाल्यावर जवळपास 8 तासांनी गाड्या बाहेर काढण्यास यश आले आहे.