
कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये गावातील खालचीवाडी येथील भातशेतीत गड नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसले आहे. गावचे ग्रामदैवत गांगोभैरी मंदिराकडे गडनदी फुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही वर्ष येथील ग्रामस्थांची नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी सातत्याने प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पुराचे पाणी घुसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे खालचीवाडी येथील ३० ते ३५ घरांचा संपर्क तुटला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आशिये सरपंच महेश गुरव यांनी आपत्ती व्यवस्थापन संपर्क साधून भातशेतीचे नुकसान व पुराचे पाण्याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असे सांगितले.