तहसीलदार रमेश पवारांच्या हस्ते ध्वजारोहण..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 16, 2023 12:17 PM
views 89  views

देवगड : तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांच्या हस्ते देवगड येथील तहसीलदार कार्यालयात ध्वजारोहणचा शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, नगरसेवक व अन्य सर्व खात्यांचे अधिकारी कर्मचारी तसेच इंटरनॅशनल ह्युमन राईट्स पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

 

ध्वजारोहण राष्ट्रगीत झाल्या नंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसाचा सत्कार तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते झाला. लक्ष्मीबाई बापू कुवळेकर, महालक्ष्मी राजाराम कोयंडे,निधी दिनकर कोरगावकर,शोभा परशुराम,खडपकर, विशेष उल्लेखनीय कामगिरी बद्दल देवगड महाविद्यालय प्राध्यापक शरद शेटे,वर्षा गावकर,तनुजा तानवडे,सुधाशु सोमण यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.

बारावी परीक्षेत कु.आदिती मिलिंद कुबल ही देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक व कु. राजसी इंद्रनील ठाकूर ही दहावी परीक्षेत देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सव सांगता सोहळ्यात देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन करण्यात आला : या प्रसंगी तालुकाध्यक्ष दयानंद तेली,उपाध्यक्ष विलास रुमडे,सरचिटणीस रविकांत कांदळगावकर,कोषाध्यक्ष गिरीश धोपटे, पोलीस कायदा विभाग अध्यक्ष विजय कदम ,मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले,महिला तालुका अध्यक्ष दीक्षा तेली शामल जोशी,तालुका संघटक रवींद्र चांदोस्कर,सदस्य विजयकुमार जोशी,शरद लाड उपस्थित होते.