
वेंगुर्ला : शिरोडा गावात वारंवार बीएसएनएल नेटवर्क खंडीत होत असून गावाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या बँका, शाळा, बाजारपेठ, हॉटेल्स यांचा व्यवहार नेटवर्कवर अवलंबून असल्याने लाईट गेल्यावर नेटवर्क बंद होते. त्यामुळे त्याचा परिणाम गावातील ग्रामस्थांना होत आहे. नेटवर्क शिवाय कोणतीही व्यवहारिक कामे होत नाहीत. त्यामूळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तरी आपल्या स्तरावरुन खंडीत होण्या-या नेटवर्कसाठी योग्य ते नियोजन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बंड्या परब यांनी व्यवस्थापक भारत दूर संचार निगम वेंगुर्ला यांच्याकडे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ गावडे, ओम परब उपस्थित होते.