अस्मसा आर्टच्या पाच विद्यार्थ्यांना JJ मध्ये प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: September 22, 2024 14:21 PM
views 314  views

सावंतवाडी  :  येथील अस्मसा आर्ट या अकॅडमीत चित्रकलेचे शिक्षण घेत असणार्‍या पाच विद्यार्थ्यांनी जे जे स्कूल ऑफ मध्ये प्रवेश मिळवला आहे.यात सलोनी संदीप कोटकर सावंतवाडी अथर्व रवींद्र आचरेकर (कुडाळ), यश बाबुराव सातर्डेकर( वेंगुर्ला ), आयुष सुरेंद्र पेडणेकर (फोंडा), नितीश साबाजी करगुटकर(वेंगुर्ला) यांचा समावेश आहे.त्यांना चित्रकार सत्यम मल्हार आणि चित्रकार अक्षय सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

हे विद्यार्थी गेली २ वर्ष अस्मसा आर्ट अकॅडमी मध्ये चित्रकलेचे धडे घेत होते.  अकॅडमी मधील शिक्षकवर्ग हा जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी मिळवलेला आहे .सत्यम मल्हार यांनी जे जे मधून बीएफए आणि एमएफए ह्या पदव्या मिळवलेल्या आहेत तर अक्षय सावंत यांनी जे जे मधुन बीएफए ही पदवी मिळवली आहे. प्राची सावंत यांच शिक्षण ठाणे स्कूल ऑफ आर्ट तर करिश्मा धुरी यांनी डिकॅड येथून चित्रकलेचं शिक्षण घेतलेल आहे.अस्मसा आर्ट अकैडमी सावंतवाडी मध्ये जवळ जवळ २०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत असून त्यांना चित्रकलेचे शास्त्रशुद्ध  शिक्षण हे दिल जात आहे तसेच अस्मसा आर्ट अकैडमी ही जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शैक्षणिक प्रवेश मिळवून देणारी सिंधुदुर्गातील एकमेव अकादमी आहे.