
रत्नागिरी : आज सकाळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते रत्नागिरी येथे 'फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन' स्पर्धेस झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित 'फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन' स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासह देशभरातील आणि जगभरातील खेळाडू यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास ह्यावेळी उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, मु.का.अ.किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व सर्व संबंधित उपस्थित होते.