
वेंगुर्ला : मत्स्य, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा करण्यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला. यामुळे शेतक-याना जसे विविध योजनांचे सरकारकडून फायदे होत होते तसे फायदे कृषी दर्जा मिळाल्यामुळे मच्छीमार व्यवसायिकांना मिळतील.
दरम्यान मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा मिळाल्यामुळे महायुती सरकारचे आभार मानण्यासाठी वेंगुर्ला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने वेंगुर्ला येथील मच्छीमार बांधवांना भेटून , लाडू वाटप करुन जल्लोष करण्यात आला.
यावेळी वेंगुर्ला भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छीमार नेते दादा केळुसकर, वसंत तांडेल, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडीस, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, अल्पसंख्याक अध्यक्ष सायमन आल्मेडा, युवा मोर्चाचे, हेमंत गावडे, भूषण सारंग, मारुती दोडशानट्टि, संतोष सावंत, नामदेव सरमळकर, विनायक केळुसकर, डिपी फर्नांडीस, श्रीकांत तांडेल, अमित गोखरनकर, आशिष तोरसकर, पिंटू कुबल, जगदीश आरवंदेकर, बूथ अध्यक्ष सुबोध खडपकर, किशोर रेवणकर, भानुदास कुबल, किरण कुबल, दशरथ तांडेल, देविदास मोटे, किशोर सांगवेकर आदी उपस्थित होते. तसेच तेथील स्थानिक मच्छीमार यांनी हा आनंदाचा क्षण साजरा केला व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.