मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 27, 2025 22:39 PM
views 64  views

सिंधुदुर्गनगरी : भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील २४ तासांसाठी हवामान विषयक इशारा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार येत्या २४ तासात किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीलगत  ४९ ते ५० किमी प्रति तास वेगाने  वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा हा वेग ६० किमी प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे.  त्यामुळे  सर्व बंदरांवर स्थानिक सावधानतेचा इशारा देण्यात आलेला असून किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांवर क्र. ३ चा बावटा लावण्यात आलेला आहे. तरी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी केले आहे.