
दोडामार्ग : शहरातील गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षेत आसलेल्या दोडामार्ग मच्छी मार्केट उद्या शुक्रवारी 21 फेब्रुवारीपासून खुले करण्यात येणार आहे. उद्यापासून याच सुसज्ज मच्छी मार्केट मधून मच्छी विक्री ला सुरुवात होणार आहे. गुरुवारी सायंकाळी सर्व मच्छी विक्रेत्यांना लॉटरीच्या माध्यमातून जागा ठरवून देण्यात येणार आहे.
येथील बाजारपेठ परिसरातील एकूण वीस गुंठे क्षेत्र असलेल्या सर्वे क्रमांक 265 मध्ये कसई -दोडामार्ग नगरपंचायतने हे मच्छी मार्केट उभारले आहे. जिल्हास्तर नगरोत्थान अभियान अंतर्गत या मच्छी मार्केट साठी रु. 41,89हजार 272 एवढा निधी देण्यात आला आहे. तर मच्छी मार्केट नजीक विविध वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 14 लाख, 47 हजार 977रुपये खर्चून विशेष विहीर देखील बांधण्यात आली आहे. आज गुरुवारी सायंकाळी चार वाजता यात मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेत्यांसाठी जागा ठरवून देण्यात येणार आहे. ही जागा लॉटरी पद्धतीने देण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.