युतीचा पहिला विजय दोडामार्गातून

खरेदी-विक्री संघात बिनविरोध निवड
Edited by: विनायक गांवस
Published on: November 03, 2022 20:32 PM
views 487  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित दोडामार्गची पंचवार्षिक निवडणूक सन 2022 ही बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना यांची युती झाल्याने काही जागेवर तडजोड केली. तर काही ठिकाणी अभ्यासू सहकार क्षेत्रातील सदस्य निवडून आले आहे. निवडून आलेल्या सदस्यांत विकास संस्था मधून ज्ञानेश्वर रामा गवस, अभिमन्यू यशवंत कुबल, संजय महादेव गवस, अशोक मुरारी सावंत, व्यक्ती सदस्यमधून गोपाळ दौलत - देसाई, गोपाळ सुरेश गवस, महिला प्रतिनिधी कल्पना - बबन बुडकुले, उपेक्षा उमेश पांगम तर इतर मागासमधून संतोष दिनकर नानचे, अनुसूचित जाती पांडुरंग मंगेश कदम यांनी निवड झाली.


मागे घेण्यात आलेले अर्जांत व्यक्ती सदस्य प्रकाश सखाराम गवस, सुरेश यशवंत दळवी, रामचंद्र वसंत चांदेलकर, विलास लक्ष्मण सावंत, महिला प्रतिनिधी सौ. दळवी, इतर मागास सुधीर चंद्रकांत चांदेलकर या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध केल्यामुळे सर्वाचे विशेष आभारी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी व बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी मानले. यासाठी विशेष सहकार्य व मेहनत सुरेश दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, श्री. एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर, रमेश दळवी, संतोष नानचे प्रकाश गवस, चंदू मळीक, अभिमन्यू कुबल, आनंद तळणकर तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, गणेशप्रसाद गवस आदींनी घेतले.

दरम्यान, दोडामार्ग तालुका सहकारी खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याबददल दोडामार्ग भाजपा मंडल अध्यक्ष सुधिर दळवी, जि.प. चे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व संजय विर्नोडकर यांचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब, अशोक दळवी, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर,नारायण राणे, मधुकर देसाई, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.