प्राथ.आरोग्य केंद्रात औषध गोळ्यांचा पुरवठा जिल्हा प्रशासनाने तात्काळ करावा

अनिल चव्हाण यांची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 15:06 PM
views 103  views

सावंतवाडी :  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध गोळ्यांचा पुरवठा जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ करावा.येथील रुग्णालय सज्ज असण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांतर्फे अनिल चव्हाण यांनी केली आहे. 

                      

येथील भौगोलिक परिस्थिती,थंड हवेचे ठिकाण,सावंतवाडी पासून 30 किलोमीटर अंतर आणि राज्यातील सर्वाधिक पावसाचे अतिपावसाचे ठिकाण,वर्षा पर्यटनासाठी येणारे लाखो पर्यटक ,घाटात गाड्यांचे अपघात  यासर्व बाबीचा विचार करून आंबोली साठी विशेष बाब म्हणून 2 महिन्यांचा अतिरिक्त साठा पुरवणे आवश्यक आहे. येथील आरोग्यकेंद्रात सध्या ब्लड प्रेशर,मधुमेह सारख्या गोळ्या उपलब्ध नाहीत.तसेच पावसाळ्याचा विचार करून सर्व प्रकारच्या औषध गोळ्या उपलब्ध असणे आवश्यक आहे. आरोग्य प्रशासनाने याचा विचार करून  तात्काळ येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात पुरवठा करावा.अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.