जिल्ह्यातील पहिली हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी कणकवलीत

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 18, 2024 13:39 PM
views 634  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरीची सुरुवात कणकवली तालुक्यात होत आहे. या गॅलरीमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी, डिफ फ्रिज, वॉशिंग मशीन यासह वेगवेगळ्या दर्जेदार हॅवेल्स ब्रँड लॉयड कंपनीच्या वस्तू ग्राहकांना आता कणकवलीत उपलब्ध होणार आहेत. या गॅलरीचे  उद्घाटन २० मार्च रोजी  वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर आर वाय एंटरप्राइजेस नावाने सुरू होत आहे. कमी विज बिल येण्यासाठी  फाइव स्टार एसी तसेच फोर स्टार थ्री स्टारची पूर्ण रेंज आपल्याला या गॅलरीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता भविष्यात आपल्याला हॅवेल्स ब्रँडच्या लॉयड कंपनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जाण्याची गरज सिंधुदुर्ग वासियांना लागणार नाही. 

तसेच एखादी वस्तू विकल्यानंतर त्याची सेवा आपल्याला मिळावी त्यासाठी सेल आफ्टर सर्विस व रिपेरिंग देखील याच गॅलरी कडून देण्यात येणार असल्यामुळे विश्वासाने आमच्याकडे येऊन खरेदी करावी असे आवाहन आर वाय इंटरप्राईजेस यांच्या वतीने करण्यात येत आहे.