
सिंधुदुर्गनगरी : राकेश परब मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा 20 एप्रिल रोजी मालवण येथील मालोंड या माळरानावर होणार असून, या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हायचे आव्हान करण्यात आले आहे.
राकेश परब मित्रमंडळ यांच्यावतीने या वर्षी प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा 20 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता सुरू होणार आहेत. या स्पर्धेसाठी खुला गट प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 20 हजार रुपये, तृतीय क्रमांक १५ हजार रुपये, चौथा क्रमांक १० हजार रुपये, पाचवा क्रमांक ७ हजार रुपये, सहावा क्रमांक ५ हजार रुपये आणि सातवा क्रमांक ३ हजार रुपये तसेच सर्व क्रमांकाना चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
गावठी गटामध्ये प्रथम क्रमांक ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३ रुपये आणि चौथ्या क्रमांकाला २ हजार रुपये असे बक्षीस आणि चषक देण्यात येणार आहे. यासाठी दया देसाई 94043 96 2000,संतोष मुणगेकर 70 20 66 47 34 तसेच निखिल परब 75 17 66 52 50 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन राकेश परम मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.