दोडामार्गमध्ये आज पहिलं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

गणेश मंदिर येथून १०० युवा कलाकारांच्या नाट्य दिंडिने होणार संमेलनाची सुरुवात
Edited by: संदीप देसाई
Published on: March 09, 2024 15:07 PM
views 83  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी या संस्थेतर्फे दोडामार्ग तालुक्यात अखिल भारतीय पहिल तालुका स्तरीय नाट्यसंमेलन उद्या होत असून त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.   येथील दळवी कॉम्लेक्स मधील विलास सभागृहामध्ये हे संमेलन होत असून तालुक्यातील नाट्य प्रेमींनी सिंधुदुर्ग या संमेलनास सहभागी व्हावे असे आवाहन कार्यवाह प्रकाश गवस यांनी दिली आहे.

      लोकनेते सुरेश दळवी यांच्या सहकार्याने व  तालुक्यातील जेष्ठ नाट्यकर्मी व दिग्दर्शक प्रकाश गवस यांच्या संकलपनेतून हे नाट्य संमेलन होत असून नाट्य प्रेमींचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे नाट्य संमेलन यशस्वी होण्यासाठी गवस यांचे सोबत सहकारी ऍड. सोनू गवस, गणेश ठाकूर  ऍड. दाजी नाईक, गोविंद शिरोडकर, उदय पास्ते, प्रा. संदीप गवस, करण शेटकर, विकास कर्पे, राजेश नाईक आदीचं सहकार्य मिळत आहे. 


  नाट्य संमेलनाची सुरवात भेडशी रोडवरील गणेश मंदिरापासून होणार आहे. नाट्य दिंडीनंतर उद्घाटन, मार्गदर्शन, मान्यवर मनोगत, नाट्यसंवाद सादरीकरण, चर्चासत्र व मार्गदर्शन यांचा समावेश आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यातील अनेक ज्येष्ठ दुर्लक्षित नाट्य कलाकारांना एकत्रित आणून त्यांचा मान सन्मान या संमेलनात करण्यात येणार आहे. या नाट्यसंमेलनाला संमेलनाध्यक्ष आचरेकर प्रतिष्ठान कणकवलीचे वामन पंडित, स्वागताध्यक्ष जि. प. चे माजी अध्यक्ष सुरेश दळवी, उद्घाटक अर्चना घारे परब प्रतिष्ठान अध्यक्ष अर्चना घारे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अजय वैद्य, कला अकादमी गोवाचे सतीश गवस यांसह कसई दोडामार्ग शहर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, पं. स. चे माजी सदस्य बाबुराव धुरी, गणेशप्रसाद गवस, जि. प. माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सरपंच संघटना जिल्हा समन्वयक प्रेमानंद देसाई, शिक्षक रमाकांत जाधव, कार्यवाह प्रकाश गवस आदी उपस्थित राहणार आहेत.


१०० कलाकारांचा सहभाग असलेली नाट्य दिंडी ठरणार लक्षवेधी

दोडामार्ग शहरात नाट्य संमेलन होत असल्याने श्री गणेश मंदिर ते थेट संमेलन स्थळापर्यंत भव्य नाट्यदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्ररथ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखावे, घोडेस्वार पहावयास मिळणार आहेत. तर गोवा राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली विर्डी ( ता. दोडामार्ग ) येथील जवळपास १०० कलाकारांच दिंडी पथक लक्षवेधी ठरणार आहे. 


असं होईल पहिलं नाट्य संमेलन

  सकाळी ९ वा. नाट्य दिंडीने होणार आहे. त्यानंतर १०.३० उद्घाटन, त्यानंतर मान्यवरांच मार्गदर्शन, तर दुसऱ्या सत्रात चर्चा सत्रे, मार्गदर्शनपर व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत.