सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेत प्रथमोपचार प्रशिक्षण

Edited by: मनोज पवार
Published on: March 20, 2025 18:36 PM
views 146  views

सावर्डे : सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे व लायन्स क्लब सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथमोपचार प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिनांक 18 मार्च 2025 या दिवशी सह्याद्री शिक्षण संस्था प्रणित सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे येथे प्रथमोपचार प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले यावेळी चिरायू हॉस्पिटल सावर्डे येथील डॉ रश्मी पाटील लायन्स क्लब सावर्डे च्या सेक्रेटरी यांची उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण दिले .

त्यामध्ये भाजणे, फिट येणे, सर्पदंश, इलेक्ट्रिक शॉक, बुडणे, कुत्रा चावणे, हृदयविकाराचा झटका येणे यासारख्या अनेक बाबींसंबंधी कशी काळजी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले .त्यांच्या टीमने कुशल पद्धतीने प्रात्यक्षिकासह उत्तम पद्धतीने सादरीकरण केले. त्यामध्ये लायन्स क्लब सावर्डे चे डॉ निलेश पाटील झोन चेरमन, डॉ वर्षा खानविलकर अध्यक्ष ,सौ मिरा पाध्ये खजिनदार तसेच सदस्य डॉ राजेश पाटील , डॉ नम्रता पाटील , श्री व्याघ्रांबर नेहतराव , श्री रमाकांत घाणेकर , सौ स्नेहल कांबळे उपस्थित होते.

यावेळी सह्याद्री पॉलिटेक्निक चे प्राचार्य मंगेश भोसले, उपप्राचार्य लांडगे  प्रथम विभागाचे विभागप्रमुख कुसुमडे, मेकॅनिकल विभागप्रमुख खानविलकर, इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख कबाडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख ओकटे, प्रथम वर्षाचे प्रा घाग, प्रा कुंभार, प्रा डॉ लीना जावकर, प्रयोगशाळा सहाय्यक प्रदिप घाग तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत तसेच मोठ्या विद्यार्थी संख्येत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी प्रथम विभागाच्या प्रा पल्लवी बोरोले व प्रथम वर्षाच्या टेक्निकल टीमचे मोलाचे योगदान लाभले.