गुरांच्या गोठ्याला आग

तीन गाभण म्हशींसह मालक गंभीर
Edited by:
Published on: January 05, 2025 18:39 PM
views 107  views

सावंतवाडी : गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत तीन गाभण म्हशींसह मालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री  उशिरा ओटवणे देऊळवाडीत घडली. आगीमध्ये होरपळणाऱ्या म्हशींचे दावे मालकाने  कापल्यामुळे या तीन गाभण म्हशींचा जीव वाचला. 

ओटवणे देऊळवाडीतील जयसिंग विष्णू गावकर यांनी घराच्या बाजूलाच असलेल्या गोठ्यातील मच्छरना परावृत्त करण्यासाठी धुकटी घालून शेतात गेले होते. मात्र, काही वेळाने गोठ्याला आग लागल्याचे जयसिंग गावकर यांना समजताच त्यानी गोठ्यात होरपळणाऱ्या म्हशींचे दावे तोडून त्यांची सुटका केली. मात्र, एक म्हैस गंभीर जखमी तर इतर दोन म्हशींचे किरकोळ दुखापत झाली. जयसिंग गावकर यांच्या हातासह डोक्याला गंभीर दुखापत झाली. शेजाऱ्यांनी  मोटार पंपाच्या सहाय्याने पाईपने ही आग विझवली. मात्र, तोपर्यंत  हा गोठा आगीत भस्मसात झाला. गुरांचे डॉक्टर अनिकेत कुडाळकर यांनी जखमी म्हशीवर उपचार केले.