कुणकेरी उपरलकर देवस्थान परिसरात आग

आठ ते दहा शेतकऱ्यांच्या काजू बागायतीचे नुकसान
Edited by: विनायक गांवस
Published on: April 03, 2023 19:15 PM
views 182  views

सावंतवाडी : कुणकेरी येथील उपरलकर देवस्थान परिसरातील जंगल भागात लागलेल्या आगीत आठ ते दहा शेतकऱ्यांच्या काजू बागायतीचे नुकसान झाल आहे. आज दुपारी ही घटना घडली. काही समाजकंटकांनी ही आग लावली असावी, असा अंदाज तेथील स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

या आगीत मोठ्या प्रमाणात काजू बागायतीचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची कल्पना दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी वनविभाग सुशेगात असल्यानं व कोणतेही अधिकारी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी राग व्यक्त केला आहे‌.