दुचाकी - चारचाकीनं अचानक घेतला पेट !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 18, 2024 06:17 AM
views 823  views

सावंतवाडी : शहरातील मच्छी मार्केट येथील दुचाकी व चारचाकी गाडीला आग लागली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली तर चारचाकी गाडी सुदैवाने भस्मसात होण्यापासून बचावली. नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला वेळीच पाचारण केल्यान मोठा अनर्थ टळला. बुधवारी रात्री हा प्रकार घडला.