चालत्या टाटा अल्ट्राने घेतला पेट !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 11, 2023 18:07 PM
views 420  views

देवगड : वळीवंडे वरून नांदगावच्या दिशेने जात असताना  टाटा अल्ट्रा गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे गाडीचे मालक बाळकृष्ण धोपटे रा. (कोंडीये फोंडाघाट) यांचे सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सदरची घटना दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास शिरगाव राकस घाटी येथे घडली.

घटनेची माहिती मिळतात आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वळीवडे येथे बाळकृष्ण धोपटे यांनी आपल्या ताब्यातील टाटा अल्ट्रा या गाडीमध्ये भुसा (कोंडा) भरून नांदगावला जात असताना शिरगाव राकस घाटी येथे पोहोचताच गाडीमधून जळाल्याचा वास येऊ लागल्याने बाळकृष्ण धोपटे यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभे केले असता अचानक गाडीने पेट घेतला. मात्र आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्यामुळे बाळकृष्ण धोपटे यांचे गाडीचे सर्व कागदपत्र पैसे मोबाईल आत मध्येच राहिल्यामुळे आगीच्या भक्षस्थानी पडले.

गाडीने पेट घेतल्याची बातमी येणाऱ्या जाणाऱ्या वाहकांना समजतात नागरिकांनी तसेच वाहन चालकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे टाटा अल्ट्रा गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र बाळकृष्ण धोपटे यांचे ऐन दिवाळी सणामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.