
सावंतवाडी : येथील विठ्ठल मंदिर परिसरात एका घराला आग लागल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ नगरपालिकेच्या बंबला पाचारण केले. यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती