
सिंधुदुर्गनगरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या जैवविविधता उद्यानानात आज अचानक लागलेल्या आगीत उद्यान, उद्यानातील झाडे जाळून खाक झाली आहेत. आगीचा भडका शासकीय विश्रामगृहा पर्यंत पोहोचला होता. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशामक बाबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र या ठिकाणी इमारत अथवा माणसाचा वावर नसल्याने मोठा अनर्थ टळला.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीत असलेले जैवविविधता उद्यान आहे. या उद्यानातील सुके गवत काढले जात नसल्याने दरवर्षी या भागांत वानवा लागतो. यावेळीही आज दुपारी १२ च्यासुमारास या जैवविविधत उद्यानांत अचानक आग लागली. दुपारची वेळ आणि त्यात अधून मधून येणारा वारा यामुळे आगीने अजून पेट घेत आगीची तीव्रता वाढू लागली. बघता बघता संपूर्ण जैवविविधता उद्यान आगीच्या भक्षस्थानी गेले. आगीमुळे उठलेल्या धुरामुळे नजीकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर उद्यानात आग लागल्याची बाब समोर आली. बघता बघता ही आग रुग्णालयाच्या मागील बाजूस आली. मात्र मध्येच रस्ता असल्याने ही आग रुग्णालयापर्यंत आली नाही. परंतु हा वणवा शासकीय विश्रामगृहापर्यंत पोहोचला होता.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून रुग्णालयातील अग्निशमन साहित्याच्या सहाय्याने रुग्णालयाच्या मागील बाजूच्या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तरीही दुसऱ्या बाजूला आगीची तीव्रता जास्त असल्याने कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशामक बांबला पाचारणा करण्यात आली. कुडाळ नगरपंचायत अग्निशामक बंब येथे पोहोचल्यावर त्या बंबाच्यासहायाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत उद्यानातील सर्व झाडे आगीच्या भक्षस्थानी जाऊन जळून खाक झाली.