राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी...!

अर्चना घारेंनी केली पाहणी
Edited by:
Published on: November 11, 2024 16:32 PM
views 396  views

दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथील शांताराम केशव गवस यांच्या राहत्या झोपडी वजा घराला शनिवारी सकाळी अचानक आग लागून त्यांचे घर आगीत जळून खाक झाले. शांताराम गवस यांचे घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे शांताराम गवस हे कामाधंद्यानिमित्त बाहेर गेले होते. शांताराम यांची पत्नी शीतल गवस या घरात होत्या. तर त्यांची मुलेही यावेळी बाहेर गेली होती. सकाळच्या सुमारास अचानक त्यांच्या राहत्या झोपडीला आग लागली. श्री. गवस यांनी नवीन घर बांधायला घेतले होते. त्यामुळे बांधण्यात येणाऱ्या घराच्या शेजारीच त्यांनी एक छोटीशी झोपडी उभारली होती. मात्र या झोपडीत त्यांनी घरातील सर्व साहित्य ठेवले होते. यामध्ये दोन कपाट, घरातील सर्व भांडी, कपडे, लहान मोठ्या वस्तू आदी सर्वच आगीत बेचिराख झाल्या आहेत. शीतल गवस या गावात आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात त्यामुळे त्यांच्याकडे अनेक प्रकारची कागदपत्रे होती तीही या आगीत जळून खाक झाली आहेत.