
कुडाळ : महादेवाचे केरवडे येथील वीज कर्मचारी धनंजय फाले यांचे कुडाळ येथे काम करीत असताना शॉक लागून निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आधारस्तंभ गेल्याने कुटुंबीयांना आधार देता यावा, या सामाजिक बांधिलकीतून माजी खासदार निलेश राणें यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने फाले यांच्या कुटुंबियांकडे ही मदत सुपूर्द केली.
यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, प्रकाश मोरये, मोहन सावंत, पंढरी परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भारतीय जनता पार्टी आपल्या कुटुंबातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून जे काय सहकार्य व मदत लागेल ती आवश्यक करून दिली जाईल. असे आश्वासन देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना दिले आहे.