जाळी फाटून नुकसान झालेल्या हॉलिक्रॉस रापण संघाला दीपक केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत..!

Edited by: दिपेश परब
Published on: September 01, 2023 12:33 PM
views 340  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला नवाबाग येथे मासेमारी करत असताना अचानक हवामानात बदल होऊन जाळी समुद्रात वाहत जात जाळी फाटून  नुकसान झालेल्या हॉलिक्रॉस पारंपरिक रापण संघाला शालेय शिक्षण मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी तात्काळ आर्थिक मदत दिली आहे. 

मासेमारीची जाळी फटल्याने पारंपारिक मच्छीमारांवर संकट ओढवल होतं. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत  दीपक केसरकर यांनी तात्काळ आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, पंचायत समिती माजी सभापती सुनील मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांच्या सहित हॉलीक्रॉस रापण संघाचे घाब्रू ब्रिटो, बबन आल्मेडा, शशिकांत मांजरेकर, बस्त्याव ब्रिटो, रुजाय फर्नांडिस, उल्लास आरोलकर, दुवाट ब्रिटो, रवि तुळसकर, मोजेस आल्मेडा, विशाल मर्ये, सेलिस्टीन फर्नांडिस, प्रशांत साळगावकर, कामिल फर्नांडिस, बाबू मांजरेकर, आत्माराम पेडणेकर, रेमेंत ब्रिटो, प्रवीण डिचोलकर, संतोष कोरगावकर आदी उपस्थित होते.