
चिपळूण : राष्ट्रीय अंधकल्याण असोसिएशन, शाखा रत्नागिरी यांच्याकडून, रत्नागिरी बसणी येथील दृष्टीबाधित मारुती कदम यांना घरकुल साठी आर्थिक सहकार्य करण्यात आलं. जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील बसणी गावातील दृष्टीबाधित सतीश मारूती कदम यांना घरकुल योजनेचा शासनाकडुन २०२४ मध्ये लाभ मिळाला आहे.
पण त्यांच्या घरकुल योजनेमध्ये अधिकचे सहाय्य म्हणून नॅब चिपळूण, जिल्हा शाखा रत्नागिरी वतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश नॅबचे जिल्हा अध्यक्ष सुचयअण्णा रेडीज यांच्या शुभहस्ते देण्यात आला. प्रसंगी कार्यवाह निलेश भुरण, संचालक अंबरीश उर्फ दादा खातू, प्रकाश पाथरे, भरत नांदगावकर, विकास अधिकारी संदीप नलावडे आदी उपस्थित होते.