
सावंतवाडी : शहरातील एका फायनान्स कंपनीने नेमळे येथील श्यामसुंदर मालवणकर या व्यक्तीला वाहन कर्ज प्रकरणी घेतलेल्या कर्ज रक्कमेवर तब्बल 69 लाख एवढा भुर्दंड आकारला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात त्यांनी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे धाव घेतली असून लोकाधिकार समितीच्यावतीने 11 फेब्रुवारीला शहरातील त्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे दर्शन आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड प्रसाद करंदीकर यांनी दिली.
ॲड. करंदीकर यांनी आज येथे शासकीय विश्रामगृह येथे समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर अविनाश पराडकर संजय पवार राजेश माने विवेक नाईक आधी पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले,नेमळे येथील श्री मालवणकर यांनी 2013 साली शहरातील त्या फायनान्स कंपने अन्य एका व्यक्तीकडून कर्ज थकीत प्रकरणी ताब्यात घेतलेला डंपर स्वतःला घेतला याकरिता फायनान्स कंपनीकडे 11 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण केले होते. त्यासाठी अडीच लाख रुपये आगाऊ रक्कम ही भरणा केली होती. त्यानंतर डंपर यांच्या नावे करण्यासाठी संबंधित फायनान्स कंपनीचे गोवा येथील व्यवस्थापकाने त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 25 हजार रुपयेही मालवणकर यांनी त्यांना दिले होते. मात्र, असे असतानाही सदरचा डंपर त्यांच्या नावे झाला नाही. दरम्यान कर्नाटक येथील एका खाजगी कंपनीकडे सदरचा डंपर भाडेतत्त्वावर लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र वाहन नावावर नसल्याने कंपनीने असमर्थता दर्शवली. या दरम्यान ते कर्जाचे नियमित हप्ते भरू शकले नाही. त्यामुळे 2015 साली कर्ज खाते थकीत झाल्याने कोणत्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय फायनान्स कंपनीने तो डंपर मालवणकर यांच्याकडून ताब्यात घेतला. तसेच आपल्या मर्जीतील ऑब्रिटेटर नेमुन अवाजवी व बेकायदेशीर रक्कमेचा अवॉर्ड पारित करुन घेतला.
त्यानंतर 2018 साली कंपनीकडून मालवणकर यांना नोटीस पाठवून तब्बल 69 लाख रुपये परतावा करण्याची मागणी करण्यात आली. या नोटीसीने मालवणकर यांना धक्का बसला त्यांनी थेट यासंबंधी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे दाद मागितली. समितीकडून विविध प्रशासकीय पातळीवर दाद मागून न्याय मिळत नसल्याने तक्रारदारावर या ओढलेल्या अन्यायाच्या विरोधात 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता फायनान्स कंपनीच्या सावंतवाडी कार्यालयासमोर धरणे निदर्शन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.करंदीकर म्हणाले, मालवणकर यांच्याबाबत घडलेल्या प्रकारासारखे अन्य प्रकारही फायनान्स कंपन्या कंपन्यांकडून घडत आहे यामध्ये अनेक जण अडकले असून त्यांना नंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र अशा प्रकारच्या संदर्भात कोणीच पुढे येताना दिसत नाही. त्यांच्यावर असे अन्याय झाले त्यांनी निर्भीडपणे पुढे येणे गरजेचे आहे. अशा अन्यायाविरोधात लोकाधिकार समिती निश्चितच आवाज उठवेल.