
सावंतवाडी : 12 नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथील भोसले उद्यानात काम करत असताना झाडावरून पडून कर्नाटक धाररवड येथील कामगाराचा गोवा बांबुळी येथे उपचार घेत असताना निधन झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी पिडित कुटुंबियांच्या नातेवाकांनी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन चे राष्ट्रीय प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रिजवान बडीवाले यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संसंबंधित ठेकेदाराकडून आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता
अर्ज केला होता. या प्रकरणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी तर्फे सावंवाडी येथील कार्यालयात संबंधीत ठेकेदार यांना बोलावून गुरुवारी एकूण खर्च रुपये तीस हजार व रुपये सत्तर हजारचा धनादेश पिडित कुटुंबियांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संबंधित ठेकेदार यांनी ही मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देवून माणुसकीची प्रचिती दर्शविली.
सादर प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन चे जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी अमित वेंगुर्लेकर,रिजवान बाडीवाले,संजय गावडे,संतोष तळवणेकर,हरीश सोंसुरकर,परवेज बेग, आबिद कित्तुर, शेहेबाझ शेख, रमिज् मुल्ला आदी उपस्थित होते.