
दोडामार्ग : तिलारी मुख्य धरणातील पाणी साठ्याने सांडवा पातळी गाठल्याने अखेर शनिवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग तिलारी नदीत सांडव्यातून सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता घाबरून न जाता आवश्यक ती सतरता बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शनिवारी धरणाची सांडवा माथा पातळी 106.70 मी. इतकी भरल्याने सांडव्यावरन पुच्छ कालव्याद्वरे नदीमध्ये धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
याबाबत कालच नदीकाठच्या सर्व गावाना सतर्क राहन्याबदद्ल सुचित करण्यात आले आहे. तसेच सर्व संबंधीत गावांमध्ये या कार्यालया मार्फत काल शुक्रवारी रात्री सायरन वाजवून इशाराही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका प्रशासन आणी जिल्हा आपत्ति व्यवस्थापन कक्ष यांच्याशी सतत संपर्कात राहुन योग्य ती कार्यवाही करणेत येत आहे. धरणातून विसर्ग सुरु होताच विसर्गाचे प्रमाण किती क्युमेक आहे हे वेळोवेळी सर्व संबंधितांना कळवणेत येणार आहे.
तर शुक्रवारी काही समाजमाध्यमामध्ये तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाला झाल्याच्या बातम्या व व्हीडियो दाखवण्यात येत होता. प्रत्यक्ष्यात तेरवनमेढे उन्नेयी बंधाऱ्यातून फक्त 98 क्युमेक इतकाच विसर्ग सुरु होता. परंतू त्यामूळे काल काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत या कार्यलायामार्फत योग्य ती वस्तुस्थिती सर्व संबंधित लोकांपर्यंत सांगण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये व अनावश्यक घाबरुन जाऊ नये असे आवाहन
सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकामचे कार्यकारी अभियंता वी. बा. जाधव यांनी केलं आहे. तर सध्यस्थितीत तीलारीतून 4.556 दलघमी पाणी विसर्ग सुरू आहे. धरण 78.54 टक्के भरले आहे.
सद्यःस्थितीत तिलारी धरण
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प*
दिनांक- 22/07/2023
वेळ- --१०.00 वा.
पाणी पातळी--------- 106.90 मी.
सांडवा माथा पातळी-- - 106.70 मी.
पूर्ण जलसंचय पातळी--113.20 मी.
उपयुक्त पाणीसाठा ---351.359 दलघमी
टक्केवारी-------------- 78.54 %
सांडवा विसर्ग----4.556 घ.मी./से.
तेरवनमेढे उन्नैयी बंधारा विसर्ग--- 98.00 घ.मी./ से.
नदितील एकुण विसर्ग---- 102.556 घ.मी./से.
डावा कालवा विसर्ग----- 12.00 घ.मी./ से.
येळपई नाला विसर्ग----- 0.00 घ.मी./से.
नदी पातळी--------- 38.90 मी
ईशारा पातळी--------- 41.60 मी.
धोका पातळी---------- 43.60 मी.
आजचा पाऊस --- 140.00 मी.मी.
एकुण पाऊस ---‐ 2080.20 मी.मी.