
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. फार पूर्वीपासूनच कर्नाटकच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबविण्यात यावी याची मागणी जोर धरू लागली होती. अनेक आंदोलन उपोषणही त्यासाठी झालेत. आजच एका हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. हे घडत असताना आता हत्ती पकड मोहिमेला प्रशासनाने हिरवा कंदील दिलाय. दोडामार्गातील या हत्तींना पकडून त्यांचं पुर्नवसन करण्याचे आदेश मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर महाराष्ट्र राज्याचे एम. श्रीनिवास राव यांनी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिलेत.
त्यांनी या आदेशात म्हटलंय की, दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेला नर हत्ती ओंकार यास बंदिस्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना पकड मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंदिस्त करण्याचे आदेश ३० जून २०२५ पर्यंत वैध राहतील. यासाठी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम मुंबई हे सदर पकड मोहिमे करिता समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. ओंकार यां हत्तीला बेशुद्ध करून पकडून तज्ञांच्या सल्ल्याने या हत्तीचे पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.