...अखेर 'त्या' दुसऱ्या कामगाराचाही आढळला मृतदेह

दोन राजस्थानी कामगार बुडाले होते शिरोडा समुद्रात !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 07, 2022 20:20 PM
views 349  views

वेंगुर्ले : शिरोडा येथील समुद्रावर मौजमजा करण्यासाठी गेलेले सावंतवाडी येथील दोघे कामगार बुडाले होते. त्यातील सुभाष रामोत्तर कुमावत (३०) याचा मृतदेह त्याच दिवशी किनाऱ्याला आढळला होता. तर आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुसरा कामगार दीनदयाळ राव (२०) याचा मृतदेह सापडला आहे.

संबंधित कामगार हे सावंतवाडी शहरात एका फरशीच्या दुकानात कामाला होते. हे दोघेही राजस्थान येथील असून दसऱ्याची सुट्टी असल्यामुळे ते मौजमजा करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत समुद्रावर गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही बुडून त्यांचा मृत्यू झाला.

दीनदयाळ राव याचा मृतदेह समुद्रात आढळल्या नंतर येथील सुरक्षा रक्षक संजय नार्वेकर, स्थानिक हॉटेल व्यावसायिक सुरज आमरे व येथील राज वॉटर स्पोर्ट्सच्या साहाय्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान हा मृतदेह रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दळवी व पोलीस नाईक योगेश राऊळ करत आहेत.