
देवगड : देवगडमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. हा घान कचरा न.पं.परिसरात डंपींग करण्यात आला होता.यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होवून आरोग्यास धोका निर्माण झाला होता.यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपाने आंदोलन छेडले त्यानंतर काही कचरा उचलण्यात आला मात्र शिल्लक राहीलेला कचरा व पडलेला पाऊस यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.हा कचरा उचलण्यासाठी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन हा संपूर्ण कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आता यश मिळवले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील नागरिकांचे तसेच नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी न.पं.परिसरातील कचरा उचलुन स्वच्छ करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी सांगीतले होते. त्याप्रमाणे त्यांना या न.पं परिसरातील सर्व कचरा उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यश मिळाले आहे. कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या कडून प्रक्रिया सुरू आहे. तोपर्यंत तात्पुरती कचरा डंपींग करण्यासाठी आपण स्वत:ची जागा मोफत देणार असल्याचे त्यांनी सांगीतले होते.तरी येथील संपूर्ण कचरा उचललून पूर्ण झाला असून आता देवगड तालुका कचरा प्रश्न मिटला आहे.