
वैभववाडी : तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मंगळवारी शिवबंधन सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या त्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. तालुक्यातून पहिला धक्का शिवसेनेला बसणार आहे.
शिवसेना फुटीनंतर वैभववाडी तालुक्यातील शिवसेनेला धक्का बसणार आहे. शिवसेनेचे दोन माजी सभापती व विद्यमान पदाधिकारी पक्षाची साथ सोडणार आहेत. उद्या मंगळवारी हे पदाधिकारी रत्नागिरी येथील प्रमुख नेत्याच्या उपस्थित बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.तसेच नवीन पक्ष कार्यालयाचाही शुभारंभ करणार आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटातील प्रवेशासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून गाठीभेटी सुरू होत्या. अखेर पहिल्या टप्यातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला. प्रथमच वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा हा प्रवेश होणार आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेशी हा मोठा धक्का मानला जात आहे.