अखेर 'नवीन कुर्ली' ग्रामपंचायत प्रस्ताव मंजुर...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 21, 2023 19:04 PM
views 209  views

कणकवली : अखेर "नवीन कुर्ली" ग्रामपंचायत प्रस्ताव मंजुरीला पुर्णविराम मिळाला आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विस्थापित मौजे कुर्ली ता. वैभववाडी.या गावाचे पुनर्वसन सन १९९५ साली नवीन कुर्ली (फोंडा—लोरे) या  ठीकाणी करण्यात आले. सदर पुनर्वसित गावठाणास सन २००२ साली महसुली गावठाणाचा दर्जा प्राप्त झाला. तत्कालीन पुनर्वसन अधिनियमानुसार आणी निकषानुसार मागील २१ वर्ष या गावठाणाची स्वतंत्र ग्राम पंचायत झालीच पाहिजे असा रास्त आग्रह नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त ग्रामस्तांचा होता.

परंतु या पुनर्वसित गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा जाणनारा कैवारी आजतागायतत्र या प्रकल्पग्रस्तांच्या नशिबी लाभला नव्हता. परंतु या गावची ग्रामदेवता आई कुर्लादेवीच्या कृपाशिर्वावादाने आणी" नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या" सततच्या पाठपुराव्यामुळे   अखेर "नवीन कुर्ली"या पुनर्वसित गावठाणाच्या स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावावर महाराष्ट्राचे जनमान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रत्यक्ष भेटी अंती पूर्णत्वाची मोहोर उठविण्यात आली असल्याचे नवीन कुर्ली ग्रामस्थांनी सांगितले.

गेली २१ वर्षे अंधःकाराच्या खाईत लोटलेल्या नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. सदरच्या नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त स्वतंत्र  ग्रामपंचायत प्रस्तावाच्या पुर्णत्वाच्या कार्यामध्ये आतापर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे, ग्रामविकास मंत्री ना. गिरीशजी महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, किरण सामंत, रवींद्रजी फाटक साहेब, नितेश राणे, शीवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे साहेब, संदेश पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.

त्यामुळे या सर्वांचे नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष रविंद्र नवाळे, कार्याध्यक्ष हरेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी सदैव रूणी राहतील. असे भावनिक ऊद्गार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रत्यक्ष भेटीअंती सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केले.

यावेळी एकनाथ चव्हाण, भगवान तेली, शिवाजी चव्हाण, मारुती कदम, मिलिंद पवार, सुनील कदम,आनंद सावंत, प्रदीप कामतेकर, राजेद्र्  तेली, उत्तम तेली, पांडुरंग चव्हाण, बाळा दळवी, चंद्रकांत तेली, चंद्रकांत चव्हाण, सुनील गोसावी, सखाराम हुंबे, संपत चव्हाण, शांताराम राणे, पांडुरंग पार्टे, गणेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.