मुंबई : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटेला पोलिसांनी कल्याण येथील घरातून अटक केल्याची माहिती मिळते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी ७ पथके रवाना केली होती. त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. काल 3 सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी आपटेविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती.
कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला त्याच्या कल्याणमधील घरातून ताब्यात घेतले. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर त्याला दोन आठवड्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले.