....अखेर दोडामार्गला मिळाले तहसीलदार

Edited by: लवू परब
Published on: October 08, 2025 13:17 PM
views 559  views

दोडामार्ग :  गेले कित्येक दिवस दोडामार्ग तहसीलदार रिक्त असलेल्या पदावर अखेर राहुल गुरव यांची दोडामार्ग तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार हे काही महिने वयक्तिक कारणास्तव रजेवर होते. त्यामुळे प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. अमोल पोवार यांची बदली झाली असून आता नव्याने राहुल गुरव यांची दोडामार्ग तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल गुरव हे यापूर्वी पालघर मुख्यालय येथे अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत होते. दोडामार्ग येथे तहसीलदार पदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. काही दिवसातच ते दोडामार्गचा पदभार हाती घेणार असल्याची माहिती आहे.